2024 परिचय सम्मेलन, Registration Is Closed परिचय सम्मेलन- रविवार, 18 अगस्त 2024, स्थान-मंगल भवन लोकमान्य नगर इंदुर आहे। याची नोंद करावी.

Please print the GATE PASS from View Registration Screen After Login.


परिचय


इंदुरात लोकमान्य नगर ही वसाहत 60-61 वर्षा पूर्वी अस्तित्वात आली. साधारण जंगलच म्हणावे लागेल अश्या भागात होती . त्या वेळी वसाहतीत फक्त 8-10 घरेच होती. साहजिकच एकत्र होण्यासाठी धार्मिक उत्सवाचा आसरा स्त्रियांनी घेतला . त्या अनुषंगाने भगिनी मंडळाची स्थापना झाली.

भगिनी मंडळाच्या संस्थापक सदस्य अक्का फाटक, मैनाताई देशपांडे, उषाताई कुंभारे, विद्याताई जोशी व आशाताई जोशी.

भगिनी मंडळाचे अनेक प्रकल्प चालू आहेत त्यात वाचनालय , योगासन केंद्र आहे.

वाचनालय –

भगिनी मंडळाच्या वाचनालयाची स्थापना 15 ऑगस्ट 1976 साली झाली. आज 300 च्यावर सदस्य आहेत. पुस्तकांची संख्या 4000 आहे.

कार्यकारिणी –

  •    वाचनालय प्रमुख – मीनल बक्षी
  •     कोषाध्यक्ष - ममता घारपुरे

समिती –

अनघा मोडक, संध्या वाटवे, आश्लेषा पारकर, छाया मुंशी, रत्ना केळकर, राधिका संत, निधी शहाणे, श्रध्दा नामजोशी, रेणुका अर्वीकर, चंचला पुंडलिक, जयश्री कापसे, पूर्णिमा बाळ, सीमा आपटे, चित्रा जोशी, अर्चना शीवरकर, कल्पना धोडपकर, प्रीती सरवटे

योगासन वर्ग

  •   दुपारी – वेळ 4 ते 5
  •   योगासन प्रमुख – सौ. अनघा मोडक

संस्था स्वतःच्या कार्यक्रमा शिवाय वसाहतीत साजरा होणाऱ्या उत्सवांत तन-मन-धनाने सहभागी होते. उदाहरणार्थ गणपती उत्सव, रामनवमी उत्सव, हनुमान गढी,कीर्तन महोत्सव ह्या शिवाय वसाहतीच्या फायद्या करिता व उत्कर्षा करीता सदैव सहकार्य देण्यास तत्पर असते.संस्था इंदूर मधील इतर संस्थाच्या मदती साठी सदैव तत्पर असते.

  •    सावरकर दर्शन प्रतिष्टान साठी 5 लाख रुपये अनुदान साठी तीन महिने प्रयत्न केले.
  •    अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन (2001) प्रसंगी 2 दिवस भोजन व्यवस्थेत सहभाग
  •    देवी अहिल्याबाई पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात एक दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन
  •    भूकंप ग्रस्त पूरग्रस्त लोकांना आर्थिक सहाय्य
  •    वैद्यकीय गरज असणाऱ्या लोकांना आर्थिक सहायता–कैंसर ग्रस्त लोकांना विशेष आर्थिक सहाय्य
  •    अनाथ आश्रम ,वृद्धाश्रम मानसिक विकलांग मुलांच्या शाळेला आर्थिक मदत.
  •    पी एम फंड, अयोध्या मंदिर, आर्मी वेलफेयर सेंटर, गर्जुन वैदकी मदद.

भगिनी मंडळाचे समाजोपयोगी कार्य पाहून प्रसिद्ध चरित्र अभिनेता श्री अच्युत पोद्दार यांनी भगिनी मंडळा ला 50000/- देणगी दिली. त्या देणगीतून जे वार्षिक व्याज येईल ती रकम कोणत्याही समाजकार्य करणाऱ्या संस्थेला किवां व्यक्तीला अनुदान स्वरूप द्यावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. गेल्या दोन वर्षा पासून ती रक्कम अशा संस्थांना देण्यात आली.

  •    सर्वात महत्वपूर्ण व अत्यंत समाजोपयोगी कार्य म्हणजे – अखिल भारतीय महाराष्ट्रीयन ब्राह्मण युवक युवती परिचय सम्मेलन आयोजित करणे, जे गेल्या 36 वर्षा पासून निरंतर भगिनी मंडळ यशस्वीपणे करीत आहे.
  •    अखिल भारतीय स्तरावर आयोजित परिचय सम्मेलनात भाग घेण्याऱ्या गरजु मुला मुलीं करता रजिस्ट्रेशन शुल्क मधे सवलत दिली जाते.

भगिनी मंडळ काळाच्या गरजे प्रमाणे ही वेबसाईट बनवुन अधिकाधिक मराठी लोकां पर्यंत आपले कार्य व विचार पोहोचवू इच्छिते.

परिचय सम्मेलन व त्याच्या पुस्तका द्वारे गेल्या 36वर्षात अनेक – अनेक लग्न ठरली आहेत. त्यांचे पत्र व लग्नाची पत्रिका पाठवून ते आम्हाला धन्यवाद देतात. जवळ- जवळ 80-90 टक्के लग्न परिचय संमेलनाच्या माध्यमातून ठरतात, या द्वारे आम्ही काही अंशी समाजाचे ऋण फेडतो व त्याचे आम्हा सर्वाना आंतरिक समाधान आहे.

या सामाजिक कार्या करिता भगिनी मंडळाला लखनऊ येथील अखिल भारतीय बृहन्महाराष्ट्र संमेलनात उज्जैन येथील श्री अण्णा साहेब विपट पुरस्काराने गौरवान्वित केले आहे. त्या नंतर 26 जानेवारी 2000 ला प्रशस्ती पत्र देऊन ह्याकार्याची मध्यप्रदेश सरकार दरबारी पण दखल घेतली होती.