संस्थेचा परिचय
1995 साली संस्था रजिस्टर्ड झाल्याच्या सुमारास लोकमान्य गृह निर्माण संस्थेने मंडळास भवन उभारण्या करिता जागा दिली व गृह निर्माण संस्थेने आर्थिक अनुदान पण दिले. संस्थेने स्वतःची गंगाजळी, सदस्यांनी दिलेले अनुदान व थोडे फार कर्ज घेऊन स्वत:ची वास्तू उभारली आहे.
विविध क्षेत्रातील कार्य व वाचनालयाची प्रगती बघुन देवी अहिल्याबाई एज्युकेशनल ट्रस्ट ने संस्थेला वाचनालयाचा हॉल बांधण्यासाठी 2 लाख रुपयांची देणगी दिली. सांस्कृतिक भवनावर एका सभागृहाची निर्मिती करण्यात आली. 8 मार्च 2001 जागतिक महिला वर्षाच्या अनुषंगाने परमपूज्यदेवी अहिल्याबाई होळकर सभागृह नांव देऊन वाचनालय हॉल चे अनौपचारीक समारंभाने उद्घाटन करण्यात आले. वाचनालयाची प्रगती बघुन बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्ष मीनाताई पिंपळापुरे यांनी रु 10000 ची देणगी दिली.
सभागृहात अहिल्याबाईंच्या मूर्ती स्थापने करीता पूर्व सांसद व पूर्व लोकसभा अध्यक्ष पद्मभूषण श्रीमती सुमित्राताई महाजन यांनी रु 40000 चे अनुदान दिले. मूर्ती ची स्थापना श्रीमती सुमित्राताई महाजन व विद्या वाचस्पती श्री शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते दिनांक 7 जानेवारी 2011 रोजी झाली . अहिल्याबाईंच्या पुण्यतिथी निमित्य दरवर्षी शिवमहिम्नस्त्रोत्र, भजन नर्मदा स्तुती असे अनेक कार्यक्रम केले जातात.
1984 मध्ये भगिनी मंडळाने वर-वधू नोंदणी केंद्राची सुरवात केली होनी
- प्रथम वर-वधू नोंदणी केंद्र संस्थापक -स्व आशा वैशंपायन, सुनीती जोग.
- प्रथम परिचय सम्मेलन संकल्पना- प्रिया खेर, स्व. ज्योत्स्ना जोग.
- प्रथम परिचय सम्मेलन भगिनी मंडळ अध्यक्षा– शोभा सरवटे .
भगिनी मंडळाचा झपाट्याने उत्कर्ष झाला हे बघायला मंडळाच्या सदस्यां बरोबर संस्थेला भेट देणारे अतिथी, अध्यक्ष आणि कलाकार, ज्यांनी आपल्या संस्थेला भेट देऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली – विजया राजे सिंधीया, शांताताई किर्लोस्कर, मालती जोशी, प्रमिला दंडवते ,मृणाल गोरे, शैलजा राजे, गिरीजा कीर, शकुंतला गोगटे, लीला श्रीवास्तव, डॉ.पुरंदरे, जयंत ओक, श्रीकांत मोघे, सुधीर मोघे, वसंत पोद्दार, सुमन धर्माधिकारी, लालन सारंग, जयश्री गडकर, सुधीर फडके, श्रीधर फडके, रवींद्र साठे, मंगला गोडबोले, अमोल बावडेकर, गीता काटे, प्रवीण दवणे, व शैलेश दातार, माधवी घारपुरे, शरद पोक्षे,अमोल बावड़ेकर,सुधीर गाडगीळ,शुभा साढे या सर्व कलाकारां व्यतिरिक्त इंदूर मधील कलाकार वेळोवेळी आपल्या आमंत्रणा ला मान देऊन येथे उत्कृष्ट कार्यक्रम सादर करतात.